सचिन तेंडुलकर ज्या प्रमाणात मीडियापासून दूर राहत होता, तशीच सचिन
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी एखाद्या राजकुमारीसारखीच आहे. राजकुमारी या अर्थाने की सचिन तेंडुलकरची सारा ही तेवढीच लाडकी कन्या आहे. सचिन तेंडुलकर ज्या प्रमाणात मीडियापासून दूर राहत होता, तशीच सचिनची कन्या सारा तेंडुलकर मीडियापासून अंतर ठेवून आहे. कितीही अफवा आल्या तरी सचिन तेंडुलकर मीडियात सहजच त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. सारानेही आपल्या बाबाच्या पावलावर पाऊल ठेवत, अफवा पसरवणाऱ्यांची आणि अंदाज बांधणाऱ्यांची पर्वा न करता कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सचिन तेंडुकरची बॅटिंग स्टाईल पाहण्यासाठी आख्खं जग वेडं होतं. सारा तेंडुलकरचीही तशीच राहण्याची स्टाईल आहे. एखाद्या राजकुमारीसारखं तिचंही छोटंस जग आहे.
सारा तेंडुलकरचं इन्स्टा अकाऊंट डोकावल्यावर तुम्हाला हे सहज समजू शकेल. सचिनच्या कन्येला सतत भ्रमंती करायला आवडतं. सचिन देखील आपल्या कन्येसोबत सतत दिसून येतो. सचिन आणि साराचं मुलगी आणि बाबाचं नातं किती घट्ट आहे हे देखील फोटोंमधून दिसून येतं.



