
Nitish Kumar And Bihar Assembly Election Result : नितीश कुमार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील. पण यावेळी राज्याची सूत्र दुसर्याच्या कोण्याच्या तरी हाती असतील असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी म्हटलं आहे.
पाटणा – संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. सोमवारी सकाळी कुमार यांचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. नितीश कुमार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील. पण यावेळी राज्याची सूत्र दुसर्याच्या कोण्याच्या तरी हाती असतील असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपाने राजकीय खेळी करून नितीश कुमार यांची ताकद कमी केली असा आरोप देखील अन्वर यांनी केला आहे.
“नितीश कुमार हे पूर्वी एनडीए आघाडीचे मोठे नेते आणि मुख्यमंत्री होते. मात्र यावेळी भाजपाने त्यांना आपल्या रिमोट कंट्रोलवर चालणारा मुख्यमंत्री बनवलं आहे” असं तारिक अन्वर यांनी म्हटलं आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान बिहारमध्ये नितीश कुमार यांची एनडीएने विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नितीश कुमार हे आमदारांसह राज्यपालांना भेटले. त्यानंतर आता नितीश कुमार हे सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील



