
महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून, किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटीका उभारण्यास वाव आहे.
महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून, किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटीका उभारण्यास वाव आहे. याच उद्देशाने शासनामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकररोपवाटीका योजना सुरू करण्यात येत आहे. याच रोपवाटीका शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करून शेतीपुरक व्यवसायांच्या संधी उपलब्ध करून देतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी दादा भुसे यांनी केले.
तालुक्यातील सातमाने गावात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना शुभारंभ व यशवंत ॲग्रो हायटेक नर्सरीचे भुमीपूजन कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शनिवारी ( दि ७) करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे, सेवानिवृत्त कर्नल अमित दळवी, दिलीप हिरे, लोटन शेवाळे, प्रगतशिल शेतकरी प्रमोद निकम, नीळकंठ निकम, दीपक देवरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भुसे म्हणाले, या योजनेचा मी दत्तक घेतलेल्या सातमाने गावात शुभारंभ करतांना विशेष आनंद होत आहे. या योजनेच्या माध्यमातून भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोगमुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, रोपवाटीकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे, पिक रचनेत बदल घडवून आणणे व नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे, शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे हा उद्देश असून तो नक्कीच सफल होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


